Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

Vijay Thalapathy : आंबेडकर वादात अभिनेता विजयची उडी, अमित शाहांवर निशाणा साधत म्हणाला.

 

Vijay Thalapathy On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून देशभरात चांगलेच वातावरण तापले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षाकडून देशभरात ठिकाठिकाणी आंदोलन केले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर आता तमिळ अभिनेता आणि  (TVK) पक्षाचा अध्यक्ष विजयने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता विजयने नाराजी व्यक्त करत काही लोकांना आंबेडकरांच्या नावाची अ‍ॅलर्जी असू शकते, असे म्हणत अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत विजयने अमित शाहांवर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये विजय म्हणाला की, ‘काही लोकांना आंबेडकरांच्या नावाची अ‍ॅलर्जी असू शकते. ते एक अद्वितीय राजकीय व बुद्धिमान व्यक्ती होते, ज्यांनी स्वतंत्रतेच्या हवेत श्वास घेणाऱ्या भारताच्या सर्व नागरिकांना सन्मान दिला.’

विजय पुढे म्हणाला की, ‘आंबेडकर… आंबेडकर… आंबेडकर… चला आपण आपल्या ह्रदयात आणि ओठांवर आनंदाने त्यांचे नाव जपत राहू.'

काय म्हणाले होते अमित शाह?

राज्यसभेतील संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत वक्तव्य केले होते. 'आजकाल ही एक फॅशन झाली आहे - आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर जर तुम्ही देवाची इतकी नावे घेतली असती तर तुम्ही सात जन्म स्वर्गात गेला असता., असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच, शाह यांच्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या माफीची मागणी केली आहे

Post a Comment

0 Comments