Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

Gautam Adani : गौतम अदानी पुन्हा अडचणीत, २ हजार कोटींची लाच दिल्याचा आरोप ; फेडरल कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

 


न्यूयॉर्क : अदानी समूहाचे सर्वेसर्वा आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अदानी आणि इतर सात जणांवर अमेरिकेत अब्जावधी डॉलर्सची लाचखोरी आणि फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणाची अमेरिकन कोर्टात सुनावणी झाली. अदानी आणि त्यांच्या पुतण्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर अदानी समूहाने अमेरिकेतील ६०० दशलक्ष डॉलर्स किंमतीचे रोखे रद्द केले. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, अभियोजकांनी बुधवारी आरोपांची घोषणा केली. सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी अदानी समूहाने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप करण्यात आला असून याआधी अदानींनी बुधवारी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली होती. अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक विजयाबद्दल कंपनीच्या अध्यक्षांनी अभिनंदन करताना आपल्या ट्विटमध्ये ही घोषणा करण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प यांचे आश्वासन
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गुंतवणुकीची घोषणा करताना गौतम अदानी यांनी अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केले. ट्रम्प यांनी ऊर्जा कंपन्यांसाठी नियम सोपे करण्याचे आश्वासन दिले ज्यामुळे फेडरल जमिनींवर ड्रिल करणे आणि पाइपलाइन बांधणे सोपे होईल. सरकारी वकिलांनी असेही म्हटले आहे की अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे आणखी एक कार्यकारी माजी सीईओ विनीत जैन यांनी कर्जदार व गुंतवणूकदारांपासून त्यांचा भ्रष्टाचार लपवून ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कर्जे आणि रोखे जमा केले

काय आहे अमेरिकेतील अदानी प्रकरण
यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने दाखल केलेल्या खटल्यानुसार, गौतम अदानी यांच्यावर अमेरिकन गुंतवणूकदारांची फसवणूक आणि अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप असून गौतम अदानी आणि इतरांवर खोटी व दिशाभूल करणारी विधाने करून अमेरिकन गुंतवणूकदार तसेच जागतिक वित्तीय संस्थांकडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे ज्यानंतर ही रक्कम लाचखोरीसाठी वापरली गेली. एका आरोपानुसार, काही षड्यंत्रकर्त्यांनी गौतम अदानींना उल्लेख करण्यासाठी "न्युमेरो युनो" आणि ‘द बिग मॅन’ या सांकेतिक नावांचा वापर केला तर सागर अदानी यांनी लाचेच्या तपशीलांचा मागोवा घेण्यासाठी आपला सेलफोन वापरला होता.

गौतम अदानींविरुद्ध अटक वॉरंट जारी
गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आल्याचे अहवालात म्हटले असून यूएस सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने दोन्ही व्यक्ती आणि सिरिल कॅबनेस या दोघांविरुद्ध संबंधित दिवाणी आरोप दाखल केले. मात्र अमेरिकन सरकारने अद्याप अदानी आणि इतर व्यक्तींवरील विशिष्ट आरोपांबद्दल संपूर्ण तपशील दिलेला नाही.


Post a Comment

0 Comments