हडपसरमध्ये चेतन तुपे पाटील यांना पाठिंब्याचा भक्कम आधार ; उल्हास तुपे आणि योगेश टिळेकर यांची माघार...
पुणे :- हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे पाटील ( Chetan Tupe Patil Support ) यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे. शिवसेना पक्षाचे नेते उल्हास तुपे ( Ulhas Tupe Shivsena ) आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश शिवाजी टिळेकर ( Yogesh Shivaji Tilekar ) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत चेतन तुपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
उल्हास तुपे यांनी चेतन तुपे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, तर योगेश टिळेकर यांनीही चेतन तुपे यांना पाठिंबा देऊन त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत केले आहे. या निर्णयामुळे हडपसरमध्ये चेतन तुपे यांचे बळ वाढले असून, त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता आहे.
चेतन तुपे यांनीही या पाठिंब्याबद्दल दोघांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांच्या माघारीमुळे हडपसर मतदारसंघातील मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकीत चेतन तुपे बाजी मारणार, असे निश्चित मानले जात आहे.
Post a Comment
0 Comments