मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अखेर 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापासून अनेक काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरी मतदार संघातून पुन्हा काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली आहे. यासह काँग्रेस कमिटीचे सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष राहिलेले नसीम खान यांना चांदवली मतदारसंघात उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. पुणे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले रवींद्र धनगेकर यांना कसबा पेठ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह पुणे जिल्ह्यातील भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे तसेच पुरंदरमधून संजय जगताप यांच्यावर काँग्रेसने पुन्हा विश्वास टाकला आहे.
राजाचे उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडवणीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसने पुन्हा एकदा प्रफुल गुडधे यांच्यावर मतदारसंघाची जबाबदार सोबत उमेदवारी जाहीर केली आहे. तर नागपूर पश्चिम मतदारसंघात विद्यमान आमदार असलेले विकास ठाकरे यांच्यावर काँग्रेसने विश्वास टाकत उमेदवारी जाहीर केली आहे. नागपूर उत्तरमधून नितीन राऊत साकोली मधून नाना पटोले तर गोंदिया मधून गोपालदास अग्रवाल यांची उमेदवारी काँग्रेस कडून जाहीर करण्यात आली आहे.
अक्कलकुवा- एड के सी पाडवी
शहादा- राजेंद्र कुमार गावित
नंदुरबार- किरण तडवी
नवापूर- श्रीकृष्ण कुमार नाईक
साक्री- प्रवीण बापू चौरे
धुळे ग्रामीण- कुणाल पाटील
रावेर- धनंजय चौधरी
मलकापूर- राजेश इकडे
चिखली- राहुल बोंद्रे
रिसोड- अमित झनक
धामणगाव रेल्वे- प्रा वीरेंद्र जगताप
अमरावती- डॉक्टर सुनील देशमुख
तिवसा- यशोमती ठाकूर
अचलपूर- अनिरुद्ध देशमुख
देवळी- रंजीत कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम- प्रफुल गुडधे
नागपूर मध्य- बंटी शेळके
नागपूर पश्चिम- विकास ठाकरे
नागपूर उत्तर- नितीन राऊत
साकोली- नानाभाऊ पटले
गोंदिया- गोपालदास अग्रवाल
राजुरा- सुभाष धोटे
ब्रह्मपुरी- विजय वडतीवार
चिमूर- सतीश वारजूकर
हदगाव- माधवराव पाटील
भोकर- तिरुपती कोंडेकर
नायगाव- मीनल खतगावकर
पाथरी- सुरेश वरपूडकर
फुलंब्री- विलास अवताडे
मीरा भाईंदर- सय्यद हुसेन
मालाड पश्चिम- असलम शेख
चांदवली- मोहम्मद खान
धारावी- डॉक्टर ज्योती गायकवाड
मुंबादेवी- अमिन पटेल
पुरंदर- संजय जगताप
भोर- संग्राम थोपटे
कसबा पेठ- रवींद्र धनंजेकर
संगमनेर- बाळासाहेब थोरात
शिर्डी- प्रभावती घोगरे
लातूर ग्रामीण- धीरज देशमुख
लातूर शहर- अमित देशमुख
अक्कलकोट- सिद्धाराम म्हेत्रे
कराड दक्षिण- पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज पाटील
करवीर- राहुल पाटील
हातकणंगले-राजू आवळे
पलुस काडेगाव- विश्वजीत कदम
जत- विक्रम सिंह
Post a Comment
0 Comments