Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

बनावट दलित उमेदवाराविरोधात राज्यभर लढा उभारणार - सचिन बगाडे


बनावट दलित उमेदवारास राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्यास त्या पक्षाच्या विरोधात दलितांनी मतदान करावे - सचिन बगाडे

पुणे - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अशातच अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या मतदार संघामधे बनावट प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना देखील नेहमी प्रमाणे राखीव मतदार संघातुन उमेदवारी देण्याची तयारी सर्वच प्रमुख पक्षांकडून होत आहे.त्याविरोधात सत्यशोधक बहुजन आघाडी सर्व दलित संघटनांना बरोबर घेऊन राज्यभर लढा उभारणार आल्याचा इशारा सत्यशोधक बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन बगाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.

पुढे ते म्हणाले की, आम्ही सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी आमचे पत्रव्यवहार चालू आहेत त्यांना आम्ही बनावट दलित उमेदवारास उमेदवारी देऊ नये अशी विनंती करीत आहोत तरी पण जर राजकीय पक्षाने बनावट जात प्रमाणपत्र आहे हे माहिती असुनही बनावट दलित उमेदवारास उमेदवारी दिली तर त्या पक्षाच्या विरोधात दलित बहुजन समाजाने मतदान करण्याचे आम्ही आव्हान करणार आहोत.

स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभा ते लोकसभा अशा सर्वच ठिकाणी बनावट प्रमाणपत्र काढून सत्ता,

पैसा याचा वापर करुण तिकिट मिळवून निवडून येत बिनदीक्कतपने सत्तेचा उपभोग घेत आहेत. यामुळे

अनुसूचित जातीसाठी राजकीय प्रतिनिधित्व संपुष्टात येण्याची भीति तयार झाली आहे. लोकसभेला अवघ्या 5 जागा असताना एकाचवेळी दोन दोन ठिकाणी बनावट दलित उभे असतात. 
उदा. मागची लोकसभा निवडणूक अमरावती व सोलापूर लोकसभा मतदार संघ तसेच यावेळी देखील लातूर मतदार संघातुन बनावट प्रमानपत्रा आधारे लातूरचे खासदार निवडून आले आहेत.

तसेच विधानसभेच्या मोहोळ, माळशिरस मतदार संघातून बनावट उमेदवारांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. ति तरी सर्वच प्रमुख पक्षानी खऱ्या अनुसूचित जातींच्या उमेदवारास तिकीट द्यावे अन्यथा राज्यातील सर्व दलित संघटना एकत्र करूण आम्ही याविरोधात राज्यभर आंदोलन करणार आहोत. या पत्रकार परिषदेस सत्यशोधक बहुजन आघाडीचे निलेश वाघमारे, व राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments