यानंतर ज्या लाभार्थ्यांचे रेशन वितरण प्रणालीशी आधार जोडणी नसेल त्यांचे रेशन बंद करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार जोडणी करून घ्यावी असे, आवाहन पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केले आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तांदळासह धान्य वितरण करण्यात येते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने
ई केवायसी करण्यासाठी सांगितले आहे.
ज्या लोकांनी आधार लिंक केले नाही, अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत बनावट लाभार्थी धान्याचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. या लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यासाठी सरकारने आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत रेशन कार्डशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. जुन महिन्यात आधार लिंक करण्यासाठी पुरवठा खात्याकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती, परंतु, पुरवठा विभागाच्या डेटा सेंटरमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे आधार लिंक करणे शक्य झाले नाही.
रेशन कार्ड होणार बंद
अन्न सुरक्षा योजनेत बोगस रेशनकार्ड धारकांचा शोध घेण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. रेशन कार्डाशी बायोमेट्रिक पडताळणी झाली नसेल तर अशा लाभार्थ्यांचे रेशन आधार लिंक करावे. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सुचनेनुसार, येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत शिधापत्रिकेशी आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस यंत्राद्वारे आधार लिंक करून घ्यावे. - सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना
चाळीस हजार लाभार्थ्यांचे आधार लिंक
पुरवठा विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात रेशनचे धान्य घेणारे १५ लाख ५५ हजार ९२४ लाभार्थी आहेत. या लाभार्थीपैकी ४० हजार ८५५ लाभार्थ्यांचे आधार लिंकची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
कार्ड बंद करण्यात येणार आहेत. यामुळे रेशन कार्ड असेल तरी धान्य मिळणार नसल्याने लाभार्थ्यांनी शिधापत्रिका आधार लिंक करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
ई-केवायसी करणे का गरजेचे
• अनेक मजूर आपल्या उपजीविका भागवण्यासाठी कामाला जातात अशा लाभार्थ्यांना रेशन मिळणे कठीण होते. मजुरांच्या बोटांचे ठसे लागत नाही किंवा रेशन कार्ड केवायसी नाही, असे कारण सांगून स्वस्त धान्य दुकानदार रेशनच देत नाही.
• या अडचणीतून लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रेशन दुकानातील ई-पॉस यंत्रावर बोटाचे ठसे किंवा डोळे स्कॅन केल्यानंतर आधार जोडणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
Post a Comment
0 Comments