Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी

                                     


नवी दिल्ली : वायनाडमधून निवडून आल्यानंतर जनतेची प्रतिनिधी म्हणून तो पहिला प्रवास असेल. लोकशाही, न्याय आणि राज्यघटनेच्या मूल्यांसाठी लढणे हाच आपल्या जीवनाचा पाया असल्याचे प्रियांका गांधी-वाड्रा यांनी म्हटले आहे.

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येथील लोकांना प्रियंका यांनी खुले पत्र लिहून ही भूमिका मांडली. या खुल्या पत्रात प्रियांका गांधी-वड्रा यांनी म्हटले आहे की, मी तुमच्यासोबत राहून कार्य करीत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मदत करेन. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर माझ्या कार्यातून वायनाडच्या लोकांशी संबंध अधिक दृढ होतील. या संपूर्ण प्रवासात तुम्हीच माझे मार्गदर्शक व शिक्षक असताल.

शपथपत्रावर आक्षेप
अर्ज सादर करताना देण्यात आलेल्या शपथपत्रात प्रियंका यांनी आपल्या संपत्तीचे संपूर्ण विवरण दिले नसल्याचा आराेप भाजपने केला आहे.
आपल्या संपत्तीसह पती राॅबर्ट वाड्रा यांच्या संपत्तीबाबत माहिती दिली नसल्याचा दावा भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गाैरव भाटिया यांनी केला. सुप्रीम कोर्टाने याबाबत दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन केले जात असल्याचा आराेप त्यांनी केला.

Post a Comment

0 Comments