Type Here to Get Search Results !

झिकीचा पुण्यात प्रवेश विविध सेवांसाठी विश्वासार्ह साथीदार...


झिकीचा पुण्यात प्रवेश विविध सेवांसाठी विश्वासार्ह साथीदार...

पुणे :- देशातील आघाडीचा उद्योगसमूह असलेल्या द चॅटर्जी ग्रुपने (टीसीजी) सेवा क्षेत्रात ऑनलाइन सुविधा पुरवण्यासाठी फर्स्ट लिव्हिंग स्पेसच्या (एफएलएस) माध्यमातून दैनंदिन गरजेच्या उपयुक्त सेवा देण्यासाठी ‘झिकी’अॅप दाखल केले आहे. या अॅपद्वारे पुण्यात प्रायोगिक तत्वावर सेवा देण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
‘झिकी’ अॅपचा उद्देश स्पष्ट करताना, एफएलएसचे एमडी आणि सीईओ सौविक बॅनर्जी म्हणाले, “‘झिकी’ हे केवळ एक अॅप्लिकेशन नाही; हा एक वैयक्तिक सहकारी आहे. प्रत्येकाला दररोजच्या आयुष्यात आवश्यक असणाऱ्या विविध सेवा प्रदान करण्यासह, तज्ज्ञांच्या साह्याने आर्थिक मार्गदर्शन देण्याचाही आमचा प्रयत्न आहे. एक सुयोग्य आणि परिपूर्ण जीवनशैली शोधणाऱ्यांसाठी एक अपरिहार्य साधन बनण्याची झिकीची आकांक्षा आहे.
आम्ही प्रायोगिक तत्वावर चाचणी करण्यासाठी पुण्याची निवड केली आहे.‘झिकी’ने येथील महत्त्वाच्या परिसरातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये लोकांना आवश्यक असणाऱ्या विविध सेवा देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये घरकामासाठी मदतनीस, घरातील लहान मुले, वयोवृद्ध व्यक्ती यांच्याकजे लक्ष देण्यासाठी मदतनीस, पार्टी किंवा गेटटुगेदरसाठी भोजनासह सर्व व्यवस्था पुरवणे अशा अनेक सेवांचा समावेश आहे. झिकी अॅपवर एका क्लिकवर विविध सेवा निवडता येतील. ही फक्त सुरुवात आहे. लवकरच ‘झिकी’चा इतर शहरांमध्ये विस्तार करणे आणि देशातील जास्तीतजास्त लोकांपर्यंत त्याचे फायदे पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असेही  बॅनर्जी यांनी सांगितले.

फर्स्ट लिव्हिंगस्पेसेसबद्दल :
फर्स्ट लिव्हिंगस्पेसेची स्थापना २०२३-२४ मध्ये करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून व्यक्ती आणि समुदायांचे जीवन सुकर करण्यासाठी कंपनी समर्पित आहे.

टीसीजीबद्दल :
न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेले,टीसीजी पेट्रोकेमिकल्स, आयटी, रिअल इस्टेट आणि आर्थिक सल्लागारांसह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. समूहाच्या विविध उपक्रमांमध्ये हल्दिया पेट्रोकेमिकल्स (एचपीएल),  एमसीपीआय, ल्युमस टेक्नॉलॉजी, लॅबव्हान्टेज, टीसीजी रिअल इस्टेट, टीसीजी डिजिटल आणि गार्डन वरेली आदींचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments