Type Here to Get Search Results !

आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांचे पार्श्वभुमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र यांनी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाची कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली...


आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांचे
पार्श्वभुमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र यांनी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाची कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली...

पुणे :- आगामी गणेशात्सव - २०२४ व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुर्वतयारी करणे करीता विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांचे अध्यक्षतेखाली पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाची दिनांक २६/०८/२०२४ रोजी कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक पार पडली आहे.

सदर बैठकीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र यांनी आगामी श्रीगणेशोत्सव- २०२४ व ईद ए मिलाद हे सण शांततेत पार पडण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेवून सदर सणांचे निमीत्ताने यापुर्वी गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून योग्य उपाय योजना करणेबाबत सांगितले. गणेश मंडळांच्या बैठका तसेच ईद ए मिलाद चे अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक घेवून योग्य त्या सुचना करणेबाबत सांगणेत आले. तसेच दंगा काबु योजना राबविणे, संवेदनशील ठिकाणी रूट मार्च करून जातीय तणाव वाढणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत सुचना केल्या. महिला विषयक गुन्हयांना प्रतिबंध करून शाळा कॉलेजमध्ये जावून मार्गदर्शन करणे, अनुचित घटनांवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे अशा सुचना करणेत आलेल्या आहेत.

तसेच आगामी विधानसभा निवडणुक २०२४ मतदान प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त व निष्पक्षपणे पार पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे याकरीता मतदान केंद्रांची माहिती घेवून आढावा घेण्यात आला, उपद्रवी लोकांचे हालचालींवर लक्ष ठेवून सोशल मिडीया मॉनिटरींग करून अनुचित संदेश-पोस्ट टाकणारे व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. योग्य ती खबरदारी व दक्षता घेणेबाबत सुचना दिल्या आहेत.

पुणे ग्रामीण जिल्हयातील गुन्हयांचा आढावा घेवून दरोडयाचे गुन्हयांना आळा बसल्याने पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले असून इतर गुन्हयांवर नियंत्रण मिळवून जास्तीत जास्त गुन्हयांचा उलगडा करणेबाबत सुचना केल्या आहेत. सदर गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण साजरे होत असताना कायदा व सुव्यस्था अबाधित

राखणे करीता पुणे ग्रामीण पोलीस दल पुर्णतः सज्ज असुन जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, बिनतारी संदेश विभाग, कल्याण शाखा या शाखेकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आराखडा, गुन्हे आढावा, तसेच आगामी विधानसभा निवडणुक २०२४ चे संदर्भात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांना अवगत केले. सदर बैठकीस अपर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग, उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली उपविभाग, तसेच प्रभारी अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, कल्याण शाखा, बिनतारी संदेश विभाग, मोटार परिवहन विभाग, वाहतुक शाखा, कार्यालय अधीक्षक व रापोनि, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी हजर होते.

Post a Comment

0 Comments