दरोड्याच्या तयारीत असणाऱ्यांचा डाव उधळला; ६ जणांवर गुन्हा...
पुणे : दरोड्याच्या तयारीत असणाऱ्यांचा डाव वानवडी पोलिसांनी उधळून लावला आहे. दरम्यान गुन्हेगारासह तिघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.११) रामटेकडी इंडस्ट्रियल एरियातील बुधानी वेफर्स कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.
तसेच पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
साहील खंडू पेठे (वय-२४), नोवेल जॉन वाल्हेकर (वय-१९ दोघे रा. महंमदवाडी रोड, हडपसर), आदित्य उर्फ गोऱ्या महेंद्र शिंदे (वय-२२ रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सुहान मुनावर खान (रा. रामटेकडी), रोहन शिंदे, रोहित साबळे (रा. काळेपडळ, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार संदिप आनंदा साळवे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की, रामटेकडी इंडस्ट्रियल एरियामधील बुधानी वेफर्स कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही तरुण हातात धारदार हत्यारे घेऊन दरोडा टाकणार आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. दरम्यान पोलीस आल्याची चाहूल आरोपींचे लागताच तीन साथीदार पळून गेले. तर तीन जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले. आरोपींकडून लोखंडी सुरा जप्त करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची सखोल चौकशी केली असता एच.पी. पेट्रोलपंपाची रक्कम दरोडा टाकून लुटणार असल्याचे आरोपींनी सांगितले.
Post a Comment
0 Comments