मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने महिलेला चिरडले...
पुणे : मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. एका महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे.
तरी देखील बिनदिक्कत बांधकाम व्यावसायिकांचे हे ट्रक, मिक्सर तीव्र उतारावरुन ये जा करीत असतात. वाहतूक पोलिसांकडून याकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष केले जाते. कारवाई करण्याचा प्रयत्न केलाच तर राजकारणी आणि लोकप्रतिनिधींकडून पोलिसांवर दबाव टाकला जातो. या अनास्थेने आज एका महिलेचा बळी घेतला. हा अपघात बुधवारी (१२ जून) दुपारी साडे बाराच्या सुमारास घडला.
Post a Comment
0 Comments