Type Here to Get Search Results !

पवारांचा खास शिलेदार उतरणार अजितदादा विरोधात विधानसभेच्या रिंगणात...

पवारांचा खास शिलेदार उतरणार अजितदादा विरोधात विधानसभेच्या रिंगणात...

पुणे : बारामतीमधून मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. आता वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. राज्यात आता अवघ्या काही महिन्यांमध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे.

यंदा बारामती लोकसभेची निवडणूक चांगलीच गाजली. पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आले. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

दरम्यान आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पवारांविरोधात विरोधात पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून युगेंद्र पवार यांना संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आजपासून तीन दिवसांच्या बारामतीत दौऱ्यावर आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्या सत्तर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. युगेंद्र पवार यांना पक्षाकडून बारामती विधानसभा मतदासंघातून उमेदवार द्यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments