निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात; कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट महागात पडणार...
पुणे : नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारणेची भेट घेऊन त्यानं केलेल्या सत्काराचा स्वीकार करणाऱ्या लंकेंचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे.
या व्हिडीओमुळं लंकेंपुढील अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.
लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी मारणेची भेट घेतली होती त्यावेळी या भेटीवरून चर्चांना उधाण येत अजित पवार गटावर सडकून टीका झाली होती. किंबहुना ती भेट म्हणजे, चूक झाली होती असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलं होत. तेव्हा आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गजा मारणेची भेट घेतल्यामुळे त्यांनाही टीकेला सामोरे जावे लागणार असंच दिसत आहे.
गजा मारणेचे राजकीय नेते आणि पुढाऱ्यांशी असणारे जिव्हाळ्याचे संबंध लपून राहिलेले नाहीत. याआधीदेखील अनेकदा नेतेमंडळींशी त्याची भेट चर्चेचा विषय ठरली होती. आता लोकसभा निवडणुकीनंतर निलेश लंके यांनी गजा मारणेच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली, जिथं मारणेनं लंकेंचा शाल श्रीफळ देत सत्कार केला आणि हा सत्कार स्वीकारणारे नवनिर्वाचित खासदार मात्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
Post a Comment
0 Comments