Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

विशाल अग्रवालचे आमदार टिंगरेंना ४५ तर डॉक्टर तावरेला १५ कॉल...

विशाल अग्रवालचे आमदार टिंगरेंना ४५ तर डॉक्टर तावरेला १५ कॉल...

पुणे : पुणे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांसह वॉर्डबॉयवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणात डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉटसअप कॉलवर संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे.

विशाल अग्रवालने आधी आमदार सुनील टिंगरे यांना फोन केले होते. त्यानंतर अजय तावरेला फोन केला. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात १५ व्हॉटसअप कॉल झाले असून यात नेमकं काय बोलणं झालं? रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाच दिली गेली का? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या संभाषणात काय चर्चा झाली. त्यात अग्रवाल काय बोलले, तावरेंनी काय उत्तर दिली? याबाबत पुणे पोलिसांनी अद्याप काही सांगितलेलं नाही. पुणे पोलिसांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेत इतर माहिती दिली आहे. विशाल अग्रवालसोबत डॉक्टर तावरेंची चर्चा झाली आणि त्यात काय घडलं हे महत्त्वाचं आहे. विशाल अग्रवाल यांनी अपघाताच्या रात्री आमदार टिंगरे यांना अनेक फोन केले. पण टिंगरेंनी फोन उचलले नाहीत. शेवटी टिंगरे यांना घेण्यासाठी विशाल अग्रवाल थेट घरी गेले अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

आमदार टिंगरे यांना विशाल अग्रवालचे ४५ कॉल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री सुनील टिंगरे यांना विशाल अग्रवालचे ४५ मिस्ड कॉल आले होते. हे मिस्ड कॉल्स पहाटे २.३० - ३.४५ च्या दरम्यान होते. सुनील टिंगरे पहाटे ३.४५ च्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यात आले. ⁠त्यादिवशी टिंगरे झोपले होते आणि मिस्ड कॉल्स अनुत्तरीत होते हे लक्षात घेऊन विशाल अग्रवाल त्याला घेण्यासाठी टिंगरे यांच्या घरी गेला. ⁠त्यानंतर टिंगरे रविवारी पहाटेपर्यंत पोलिस ठाण्यात हजर होते.

Post a Comment

0 Comments