काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला...
पुणे : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससून रुग्णालयाच्या डीनची भेट घेतली दबावाला बळी पडू नका अशी सूचना त्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना केली तसंच मंत्र्यांच्या जवळचे असल्याने डॉक्टर तावरेंना पद मिळालं, असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर बोलताना म्हणाले की, ससून रुग्णालयातील डीनची आज मी भेट घेतलीय. याप्रकरणी तुमच्यावर कुणाचाही दबाव आला, तर त्याला बळी पडू नका. हा संपूर्ण समाजाचा विषय आहे, हा देशातील नागरिकाचा विषय आहे. लवकरात लवकर तुम्ही चौकशी पूर्ण करून अहवाल द्या. चुकीच्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मी विनंती केली
पोलिसांकडून लाखो रुपये जप्त केले आहेत. डॉ. तावरे विरोधात याआधी पण आक्षेप होते. तुमच्यावर दबाव आला तरी, तुम्ही दबावाला बळी पडू नका, असं डीन यांना सांगितलं आहे. डॉ. तावरे मंत्र्याच्या जवळचे असल्यानं पद मिळालं, रात्री दोन वाजता डॉ. तावरे ब्लड रिपोर्ट बदलतो. हे किती भयानक आहे. रक्ताच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाली. असं धंगेकर म्हणाले आहेत. तसेच, माझ्यावर स्टंट करत असल्याचे आरोप केले जातात, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान पुण्यात ससून हॉस्पिटलमधील एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. रक्त चाचणी विभागातील कर्मचारी बेपत्ता असल्याची चर्चा आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळतेय. मात्र कोणीही बेपत्ता नाही असा दावा पोलिसांनी केलाय. Cctv फुटेज मध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना चौकशीसाठी
बोलावणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. चौकशीला येणार नाहीत, त्या सर्वांना घेऊन येणार आणि चौकशी करणार असं उपायुक्तांनी म्हटलंय.
Post a Comment
0 Comments