आम्ही चुना लावत बोंबलत बसू का : अजित पवार...
पुणे : शिरुरमध्ये धरण आहे. पाणी आपल्या उशाशी आहे, मात्र काही जण पाणी पळवून नेत आहेत.जुन्नर आणि आंबेगावला जेवढी पाण्याची गरज आहे, तेवढच ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हर फ्लोचे पाणी घेऊन जा.
परंतु आता खालून बोगदा काढला तर उन्हाळ्यात आम्ही आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का? असे म्हणत उपुमख्यमंत्री अजित पवारांनी आमदार रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. शिरुरमध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरावांच्या प्रचारासाठी अजित पवारांची आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवारांना वाढवलं, नंतर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला सोडून शरद पवार गेलेच ना? असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हणा साहेबांच्या विचारधारेला सोडून ते गेलेच ना? पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात स्वतः लिहिलं आहे. मी ३५ वर्षे साथ दिली. पण आता मी ६० च्या वर गेलो, कधीपर्यंत थांबायचं मी आता.. मी अनेक वेळा साहेबांना सांगितले होते.
कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला
शिवरायांची भूमिका ते अगदी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका,समाज व्यसनाधीन होईल अशा जाहिराती करून आपलं पोट भरू नये, असे म्हणत शिरुरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या अभिनयावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खोचक टोला लगावला आहे.
Post a Comment
0 Comments