सकल नाभिक समाजाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा...
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे भाजप उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना विविध संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. पुणे शहरातील सकल नाभिक समाजाने मुरलीधर मोहोळ यांना पाठिंबा जाहिर केला आहे.
नाभिक समाजाने दिलेल्या पाठींब्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांनी सकल नाभिक समाजाचे धन्यवाद मानले आहेत.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुणे शहर सकल नाभिक समाजाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपा-महायुतीचा उमेदवार म्हणून मला पाठींबा जाहीर केला असून या भूमिकेबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद! समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा निश्चितपणे करेल, असा शब्द मोहोळ यांनी यावेळी समाज बांधवांना दिला.
यावेळी रामदास सूर्यवंशी, रत्नदिप खडके, सुनील पांडे, नितीन पंडित, ज्ञानेश्वर रायकर, दिनकर चौधरी, अमोल पांडे, रविंद्र मावडीकर, सुनील रसाळ, रविंद्र राऊत, महेश सांगळे, सुजित मगर, गणेश वाळुंजकर, विशाल वाळुंजकर, हेमंत श्रीखंडे, नितीन भुजबळ, अमोल थोरात, गणेश आहेर, शिवाजी पांडे, बाळासाहेब भामरे, महेंद्र गायकवाड, अरविंद झेंडे, निलेश खडके, मारुती आढाव, शशिकांत साळुंके, अशोक चटपल्ली, गणेश कुऱ्हाडे, संपत ठोंबरे, योगेश रसाळ, ॲड. शरद सूर्यवंशी, विनायक रणदिवे, दीपक कुऱ्हाडे, विनायक गायकवाड, सचिन सूर्यवंशी, गोविंद वाघमारे, हभप उमेश महाराज शिंदे, अनिल सांगळे, भगवान शिंदे, परशुराम काशिद, जयंत राहूरकर, राजा दळवी, निलेश सौंदणे यांचे मुरलधीर मोहोळ यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments