पुण्यातील खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात निघाली भरती...
पुणे : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे अंतर्गत सध्या विविध रिक्त जागांसाठी उमेवारांची भरती केली जाणार आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत.
यासाठी उमेदवारांची निवड कशाप्रकारे केली जाणार आहे सविस्तर जाणून घ्या…
वरील भरती अंतर्गत "सहाय्यक वैद्यकीय अधिकारी" पदांच्या एकूण ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता ३० मे २०२४ रोजी अर्जासह संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे.
शैक्षणिक पात्रता
यासाठी एमबीबीएस, एमएमसी नोंदणीकृत, इमर्जन्सी केस मॅनेजमेंटचा अनुभव असायला हवा.
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे इतकी आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे-३ या पत्त्यावर आयोजित करण्यात येईल.
मुलाखतीची तारीख
मुलाखत ३० मे २०२4 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
उमेदवारांनी मुलाखतीस येण्यापूर्वी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
Post a Comment
0 Comments