Type Here to Get Search Results !

पुण्यात काँग्रेसला मोठा फटका ; मुस्लिम धर्मगुरूंनी AIMIM पक्षाचे पुण्याचे उमेदवार अनिस सुंडकेंना दिला जाहीर पाठिंबा...

पुण्यात काँग्रेसला मोठा फटका ; मुस्लिम धर्मगुरूंनी AIMIM पक्षाचे पुणे लोकसभेचे उमेदवार अनिस सुंडकेंना दिला जाहीर पाठिंबा...

पुणे (मुज्जम्मील शेख):- पुणे शहरात निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना पुण्यात मात्र काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. कारण काँग्रेसचा महत्त्वाचे मतदार हे मुस्लिम समाज आहे. परंतु मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनीच काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडे पाठ फिरवत आपला मोर्चा घेत एआयएमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांना पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत धर्मगुरूंनी पाठिंबा दिला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचे पुण्यात चित्र दिसून येत आहे.
                      👇👇 पहा व्हिडीओ 👇👇
                      👆👆 पहा व्हिडीओ 👆👆

रवींद्र धंगेकर हे सध्या पुण्यात वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर वक्फ बोर्डाची जमीन लाटल्याच्या आरोपावरून तसेच  या सर्व मुस्लिम समाजातील धर्मगुरूंनी आपला पाठिंबा एआयएमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके यांना देण्याचे ठरवले आहे. तसेच या धर्मगुरूंनी सांगितले आहे की लवकरच पुणे शहरातील 200 पेक्षा अधिक मज्जितीतील मौलाना आणि धर्मगुरू अनिस सुंडके यांना पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मुस्लिम समाज धंगेकरांवर तीव्र नाराज...
शहरात सध्या मुस्लिम समाज धनगर तीव्र नाराज असल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. त्यामध्ये सर्वस्वी कारणीभूत वक्फ बोर्डाच्या जमिन लाटल्याच्या प्रकरणावरून, बाबरी मस्जिद तोडणाऱ्या कार सेवकांचे सत्कार त्यांनी केले त्यावरून आणि तसेच शेख सल्ला दर्गा प्रकरणात काहीही मदत न केल्यामुळे शहरात मुस्लिम समाज तीव्र नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments