Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

ट्रेलरच्या केबिनचा दरवाजा लावताना कंटेनर धडकला चालकाचा दुर्दैवी मृत्यू...

ट्रेलरच्या केबिनचा दरवाजा लावताना कंटेनर धडकला चालकाचा दुर्दैवी मृत्यू...

चाळकवाडी : (ता. जुन्नर) येथे उभ्या असलेल्या ट्रेलरचा चालक केबिनचा दरवाजा लावत असताना कंटेनर धडकल्याने जागीच ठार झाला...

याबाबत आळेफाटा पोलिसांनी माहिती दिली की, पुण्याहून नाशिककडे जात असलेला ट्रेलर (क्र.एमएच १५ सीके २४९६) चाळकवाडी येथे असलेल्या टोल नाक्याजवळ मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला थांबला. 

त्यावेळी ट्रेलर चालक आशिष सुखलाल पटेल (रा. गंभीरा, कटरा, ता. जठवरा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश) हा खाली उतरून दरवाजा लावत असताना पाठीमागून आलेला कंटेनर (क्र. आरजे १४ जीपी ३०७७) ट्रेलरच्या केबिनला घासला.

त्यात ट्रेलर चालक आशिष पटेल याच्या डोक्याला गंभीर दुखापती होऊन तो जागीच ठार झाला. याबाबतची फिर्याद टोलनाका कर्मचारी गणेश गावडे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात मंगळवारी उशिरा दिली.

Post a Comment

0 Comments