Type Here to Get Search Results !

बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्यांना पुणे पोलिसांचा दणका; तब्बल २८ जणांना बेड्या...

बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्यांना पुणे पोलिसांचा दणका; तब्बल २८ जणांना बेड्या...

पुणे : पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासोबतच कोयता आणि अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या व विक्रेत्यांना जरब बसविण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहिम राबवत मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखा व स्थानकि पोलिसांनी या कारवाईत तब्बल ४२ पिस्तूले, ७४ काडतूसे आणि २८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच पिस्तूल बाळगण्यासोबतच त्याची विक्री करणारे पुण्यातील वितरक यांच्यासह मुख्य पुरवठादार देखील रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सुनिल तांबे, सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, क्रांतीकुमार पाटील, नंदकुमार बिडवई तसेच पोलीस अंमलदार सुनिल पवार, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, कानिफनाथ कारखेले व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गुन्हे शाखेने शहरात केलेल्या कारवाईत तब्बल ९ गुन्हे दाखल करत २८ पिस्तूले व ५४ काडतूसे पकडली आहेत. तसेच १४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका मोठ्या खूनाचा कट देखील उधळला गेला आहे. नुकताच पोलिसांवर गोळी झाडत पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नवनाथ उर्फ नव्या निलेश वाडकर व त्याच्या साथीदाराला पकडले होते. त्यानेच एका मोठ्या खूनाचा कट रचल्याचे उघडकीस आणले आहे. या टोळीकडून ५ पिस्तूले जप्त केली आहेत.

यासोबतच इतर सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकत पिस्तूले जप्त केली आहेत. तत्पुर्वी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व अभिनेता सलमान खान याच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या प्रकाराने पुणे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था आबादीत राहण्यासाठी विशेष काळजी घेत गुन्हेगारांची झडती सुरू केली आहे. परंतु, ही शाळा पुर्ण होताच सलग चार दिवस गोळीबाराच्या घटना घडल्या. त्यानूसार विशेष मोहिम राबविण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments