Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

पुण्यात आल्यावर पंतप्रधानांना उद्योग पळवल्याची आठवण होणार...

पुण्यात आल्यावर पंतप्रधानांना उद्योग पळवल्याची आठवण होणार...

नारायणगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार म्हणून महाराष्ट्राच्या तरुणांनी त्यांचे स्वागत केले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असेल. मात्र या तरुणांच्या नशिबात आलेले रोजगार हे अत्यंत निष्ठुरपणे विशेष करून वेदांत फाक्सकॉन असेल , टाटा एअरबस असेल, इतरही कंपन्यांचे अनेक प्रकल्प इतर राज्यांत नेले.

या कंपन्यांमुळे लाखो रोजगार उपलब्ध झाले असते. ते इतर राज्यांत विशेष करून गुजरातकडे नेण्यात आले, ही जी परिस्थिती आहे, हे विचार त्यांच्या मनात या भागात आल्यावर येतील, असा उपरोधिक टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लगावला.

शिरोली बुद्रुक येथे आयोजित पत्रकार परिषदेत खा. डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी श्री विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, तुषार थोरात, गुलाब पारखे, बाजीराव ढोले, सुनील मेहेर, सूरज वाजगे, अनंतराव चौगुले, तौशिब कुरेशीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डाॅ. कोल्हे म्हणाले, चीनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली तेव्हा अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडल्या, त्यातील एकही कंपनी भारतात आली नाही, ही फार मोठी धोक्याची घंटा आहे. जिथे एकाधिकारशाही असते, त्या देशात परराष्ट्र गुंतवणूक होत नाही, हा जगाचा सिद्धांत आहे. देशात एकही गुंतवणूक न होणे हा अनेक तरुणांचा रोजगाराचा घास हिरावून घेणं आहे. आज कांदा निर्यातबंदी उठवली, ती विशेष करून गुजरातचा कांदा निर्यात करण्यासाठी उठवली आहे. कांद्याची निर्यातबंदी झाली त्यावेळी राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी आवाज का उठविला नाही? आता गुजरातसाठी कांदा निर्यात बंदी कशी उठवली ? महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे कांदा निर्यातबंदीमुळे हजारो कोटींच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल कोल्हे यांनी केला.

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार पाच सभा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिरूर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरूर, खेड -आळंदी, जुन्नर या विधानसभा मतदारसंघांत शरद पवारांची प्रत्येकी एक अशा एकूण पाच सभा घेणार आहेत. तसेच, उद्धवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत ७ मे रोजी रॅली होणार आहे.


Post a Comment

0 Comments