पुणे :- बारामती येथील अजित पवार यांचे अत्यंत जवळीक आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सलग 13 वर्षांपासून बारामती शहर अध्यक्ष पद भूषविलेले राहुल कदम यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजित पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उप अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे.
अजित पवार यांनी त्यांना निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या प्रश्नासाठी स्वतः अजित पवार लक्ष घालणार असल्याचे त्यांनी राहुल कदम यांना सांगितले आहे.
तसेच कदम यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. राहुल कदम यांचा राज्यात विद्यार्थी आणि युवकांचा दांडगा जनसंपर्क आहे. या कामांना पाहता त्यांची महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निवडीनंतर काय म्हणाले राहुल कदम...
कदम यांनी सांगितले की, "अजित दादांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी सार्थ पार पाडेल. पक्षाचे ध्येय धोरणे विद्यार्थी आणि युवकांपर्यंत पोहोचवणार आहे."
तसेच लवकरच जिल्हास्तरीय युवक मेळावा, रोजगार मेळावा आयोजित करण्यात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना आणि युवकांना अडीअडचणी असल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम देखील करणार असल्याचे सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments