Type Here to Get Search Results !

Add

Add

भागीदारीत खरेदी केलेली जमीन नावावर करुन देण्यास विरोध केल्याने मित्रानेच मित्राचा निघृण खून करणा-या आरोपीस कोंढवा पोलीसांनकडुन २४ तासात अटक...


भागीदारीत खरेदी केलेली जमीन नावावर करुन देण्यास विरोध केल्याने मित्रानेच मित्राचा निघृण खून करणा-या आरोपीस कोंढवा पोलीसांनकडुन २४ तासात अटक...

पुणे ;- दि.१०/०४/२०२४ रोजी रहेजा स्टरलिंग फेज ६ क्लाऊड ९ सोसायटी मधील चालु बांधकाम सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रेशर टकमध्ये पंकजकुमार मोती कश्यप, वय ३५ वर्षे, रा. कृष्णानगर, ग.नं.०२. महंमदवाडी पुणे हा सुपरवायझार काम करणारा इसम पडुन मयत झाला असल्याची माहिती प्राप्त झाली होती. पंरतु घटनास्थळवर पोलीसांनी भेट दिली असता सदर इसम हा पडुन मयत झाला नसुन व्याचा पाचव्या मजल्यावरील चालु बाधकामाच्या फ्लॅटमध्ये पुर्ण शरिरावर धारधार हत्याराने ठिकठिकाणी मोकसुन त्याच्या पोटावर वार करुन त्याची आतडी बाहेर काढून खुन केल्याचे व खुन करुन रक्ताचे डाग मातीने झाकून त्याची बॉडी प्रेशर डक माये टाकुन दिल्याने कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि क्र ४२३/२४ भादवि कलम ३०२ प्रमाणे अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळावर भेट देवून व घटनेचे गांर्गीय पहाता आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वपोनि संतोष सोनवणे, पोनि गुन्हे मानसिंग पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि लेखाजी शिंदे, पोउपनि बालाजी डिंगोळे व त्यांचे तपास पथक अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होते. घटनास्थळावरील मजुरांना मयत इसमांबाबत विचारणा करता त्याचे नाव पंकजकुमार मोती कश्यप रा. मुळ उत्तरप्रदेश हा असल्याचे समजले तो रहेजा कन्स्ट्रकशन च्या लेबर कॅम्पमध्ये रहावयास असुन तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम पहातो. अशी प्रथमदर्शनी माहिती मिळाली त्यावरून अधिक तांत्रिक तपासात मयतास घटनास्थळी कोणीतरी बोलावून घेतल्याचे निष्पक्ष झाले. बोलावुन घेणामा संशयीतापैकी एक राज उर्फ सुरेश मनीराम आर्या हा खुनाच्या रात्रीच आणखी काही मजुरांसमवेत उत्तरप्रदेश येथे फहुन गेल्याचे समजले लागलीच एक पथक उत्तरप्रदेश येथे आरोपीचा माग घेणाासाठी रवाना करण्यात आले.

मजुरांकडे चौकशी दरम्यान व नातेवाईकांचा शोध घेवून मयत इसम हा आरोपी राज उर्फ सुरेश मनीराम आर्या, वय ३४ वर्षे, सध्या रा. महंमदवाडी पुणे मुळ रा. उत्तरप्रदेश याच्या सोबत पुर्वी काम करित असताना दोघांनी मिथुन मुळगावी उत्तप्रदेश येथे एकत्रित जमीन खरेदी केली असल्याचे व ती जमीन मयत पंकजकुमार मोती कश्यप याच्या नावावर असून ती तो सुरेश आर्या यास नावावर करुन देण्यास विरोध करित असल्याने त्यांच्यामागे वाद झाले होते अशी माहिती मिळाली.

तांत्रिक विश्लेषण करून तसेच साईटच्या बाहेरिल रोडवरील ४२ सीसीटिव्हि फुटेजची पाहणी केली असता आरोपी याच्या सोबत भोलानाथ राजाराम आर्या, वय २६ वर्षे, साध्या रा. रहेजा व्हिस्टा लेबर कॅम्प, पुणे रा. मुळ रा. उत्तरप्रदेश हा त्यानंतर संशयिताचा शोध घेण्यासाठी तिन पथके तयार करून शोध कार्य सुरू केले. अधिक चौकशी करता आरोपी भोलानाथ हा पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी लेबर कॅम्पमध्येच बांबुन असल्याने त्यास ताब्यात घेवून विचारपूस केली असता नमुदया गुन्हा आरोपी सुरेश याच्या सोबत केल्याचे कबुल केले तसेब दुसरा आरोपी राज उर्फ सुरेश मनीराम आर्या, वय ३४ वर्ष, सध्या रा. महंमदवाडी पुणे मुळ रा. उत्तराम्देश हा त्याच्या बुजगावी घोरमा परसिया, उत्तरप्रदेश येथे पळुन गेल्याने तत्पूर्वीच पोतमनि बालाजी डिगोळ यांच्याबरोबर एक पथक उत्तर प्रदेश येथे आरोपीच्या मुळगावी पाठवुन त्याची वाट पहात दबा धरून बसले त्यांनी स्थानिक पोलीसाच्या मदतीने सदर आरोपी हा त्याच्या घरी पोहचण्याच्या अगोदरच त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यानेही त्याचा साथीदार नातेवाईक (दाजी) भोलानाथ राजाराम आर्या, यांच्या मदतीने खुन केल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यामध्ये कोणताही सुगावा नसताना पोलीसांनी तांत्रिक कौशल्य तसेच अथक मेहनीतीने परिश्रम करून आरोपीतांना चोविस तासाच्या आत जेरबंद केले. सदर गुन्हयाचा अधिक तपास बरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे करित आहेत.

वरिलप्रमाणे कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त, मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पूर्वे प्रादेशिक विभाग, आर राजा, पोलीस उप आयुक्त परि.०५. मा. गणेश इंगळे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उप निरीक्षक बालाजी हिंगोले, पो.हवा. अमोल हिरवे, निलेश देसाई, पो. शि. शाहिद शेख, लक्ष्मण होळकर, अभिजीत जाधव, संतोष बनसुळे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अक्षय शेंडगे, जयदेव भोसले,  विकास मरगळे, पो. शि. अशांक खाडे, पो. शि. रोहित पाटील, पो. शि. राहुल थोरात, पो.शि अभिजीत रानपारखी, पो.शि. सुरज शुक्ला, पो. शि. सुजित मदन यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments