Type Here to Get Search Results !

कामगारांना धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर

कामगारांना धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर...

पुणे : मुंढव्यातील ओरिला हॉटेलच्या दोन कामगारांना धारदार शस्त्राने मारहाण करणाऱ्या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील नितीन भालेराव यांनी दिली आहे.

आबीद युसूफ खान असे जामीन मंजूर झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिलला मुंढव्यातील ओरिला हॉटेलचे दोन कामगार काम संपवून मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरी निघाले होते. घरी जात असताना तिघांनी दोघांना अडवून आम्हाला हॉटेलमध्ये का एंट्री दिली नाही आणि तुम्ही का हसत होते. या कारणावरून त्यांच्याकडे आणलेल्या धारदार शास्त्रांनी डोक्यात हातावर खांद्यावर सपासप वार केले होते.

त्यानुसार फिर्यादीच्या तक्रारीवरून ३ अनोळखी व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि ईतर कायद्यान्वये मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान ओळख पटवून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आरोपीची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.

आरोपीने कारागृहात असताना अमित ईचंम व नितीन भालेराव या वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीनाचा अर्ज दाखल केला होता. सदर गुन्हा हा अनोळखी लोकांनी केला आहे, अशी फिर्याद असताना आरोपीस केवळ संशयावरून अटक केली आहे. तसेच आरोपीची ओळख परेड घेण्यात आलेली नाही. त्यामुळे याच आरोपीने गुन्हा केला आहे असे म्हणता येणार नाही, असा युक्तीवाद आरोपी पक्षातर्फे करण्यात आला.

दरम्यान, दोन्ही पक्षांच्या बाजूने युक्तिवाद ऐकून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. माधव जामदार यांच्या खंडपीठाने आरोपीस अटी व शर्तींवर जामीनावर सोडण्याचे आदेश पारीत केले आहेत. अशी माहिती आरोपींचे वकील नितीन भालेराव यांनी दिली.

Post a Comment

0 Comments