पुण्यातील काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला अंतर्गत विरोध ; पुण्यात काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता ?
पुणे :- देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना, पुण्यात मात्र काँग्रेसचे उमेदवाराची गोची झाल्याची पाहायला मिळत आहे. पुण्यात रवींद्र धंगेकर यांना अक्षरशः पक्षातच विरोध होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याच सोबतीला मुस्लिम समाज देखील नाराज असल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे. मुस्लिम समाजातील अनेक व्हाट्सअप ग्रुपमध्ये धंगेकरांना विरोधात मेसेजेस सुरू आहेत. तसेच आमदार झाल्यापासून एका वर्षात कॉंग्रेस पक्षातील एकाही कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन काम न केल्याचेही काहींमध्ये नाराजीची चर्चा आहे.
मुस्लिम समाज शेख सल्ला दर्गा यामध्ये रवींद्र धंगेकर यांनी कोणतीच भूमिका घेतली नसल्याने त्यांच्यावर तीव्र नाराज असल्याचे शहरात चित्र आहे.
तसेच या सोबतीला आणखीन भर पडता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांचा देखील त्यांना तीव्र विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे शहरातील अनेक काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची गोची झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण पक्षाने कसबा पेठ विधानसभा पोट निवडणुकीत रवींद्र धंगेकरांना तिकीट दिले होते. त्याला फक्त एकच वर्ष पूर्ण झालेले आहे. पुन्हा त्यांनाच लोकसभेचे उमेदवार करण्यात आले आहे. यामुळे काँग्रेस पक्षात नाराजीचे स्वर दिसून येत आहे.
आबा बागुल हे काँग्रेस पक्षात गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहेत व त्यांनी एक निष्ठेने पक्षाचे काम केल्याचे पाहयला मिळाले आहे. आबा बागुल यांना पक्षाने डावळल्यामुळे पक्षांतर्गत स्पष्ट फूट पडल्याचे पाहायला मिळाले आहे.
तसेच आबा बागुल यांनी 23 मार्च शनिवारी पुण्यातील काँग्रेस भावनासमोर मुख आंदोलन घेतल्यामुळे त्याचा शहरात मोठा इम्पॅक्ट पडला आहे. शहरातील जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते आबा बागुल यांच्या बरोबर असल्याचे यात स्पष्ट झाले आहे.
तसेच आबा बागुल यांनी 23 मार्च शनिवारी पुण्यातील काँग्रेस भावनासमोर मुख आंदोलन घेतल्यामुळे त्याचा शहरात मोठा इम्पॅक्ट पडला आहे. शहरातील जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते आबा बागुल यांच्या बरोबर असल्याचे यात स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस पक्षाने पुण्यात उमेदवार देताना या सर्व गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे होते. पक्षाच्या या चुकीच्या निर्णयामुळे पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांच्या प्रतिक्रिया...
2024 ची लोकसभा निवडणूक लागलेली आहे.प्रत्येक राष्ट्रीय पक्ष आपआपले उमेदवार घोषित करीत आहे.
त्यातच पुण्यनगरीत सुध्दा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे उमेदवार घोषित केला गेला आहे.
मी एक पुणेकर व सजग नागरिक असल्या कारणाने माझे मतप्रदर्शन करू ईच्छितो की,
1 - ज्या,काँग्रेसची दारोमदार अल्पसंख्याकांच्या मतांवर अवलंबून आहे त्या काँग्रेसने उमेदवार घोषित करण्यापूर्वी अल्पसंख्याकांची मते व मतदारसंघातील विचार व मतप्रवाह विचारात घेतलाय काय ?
2- त्याच विधानसभेतील पोटनिवडणुकीत अल्पसंख्याक कोणाच्या बाजुने होता व त्याचा काय परिणाम झाला हे विचारात घेतले गेले का ?
3- सदस्थितीमध्ये अल्पसंख्याक पुढे पर्याय नसल्यामुळे हा समाज कोणा सोबत उभा राहणार आहे ? हे माहीत आहे ना.
4- मग, मागील राम मंदिर उदघाटन प्रसंगी पुण्यनगरीत जी फ्लेक्स बाजी झाली व कसबा पेठ दर्गा आणि मस्जिद प्रकरणी (रविंद्र धंगेकर) लोक प्रतीनिधीचा काहीच सहभाग न दिसल्यामुळे अल्पसंख्याक समाज नाराज आहे या गोष्टीचा विचार,आढावा या राष्ट्रीय पक्षाने उमेदवार घोषित करण्यापुर्वी लक्षात घेतला होता काय ?
एक पुणेकर
गौस करीम शेख
येरवडा,पुणे
क्रमशः
Post a Comment
0 Comments