बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड...
पुणे :- सोलापूर येथे संविधान मेळावा आरपीआय (आठवले गट) चे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी सामाजिक न्याय मंत्री व आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. या कार्यक्रमात राजाभाऊ सरवदे यांनी दौंडचे बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे यांची आरपीआय आठवले गटाच्या युवक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आले.
बुद्धभूषण उर्फ विकी सरवदे हे गेल्या अनेक वर्षांपासून आरपीआय पक्षाशी एकनिष्ठपणे काम करत आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यात वेगवेगळी समाज उपयोगी कार्यक्रमे आयोजित केली आहेत.तसेच त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. या कामांना पाहता त्यांची आरपीआय आठवले गट युवक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांना सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
निवडीनंतर काय म्हणाले सरवदे...
सरवदे यांनी सांगितले की, "वरिष्ठांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याला मी सार्थ पार पाडेल. पक्षाचे ध्येय धोरणे युवकांपर्यंत पोहोचवणार आहे." तसेच लवकरच जिल्हास्तरीय युवक मेळावा, रोजगार मेळावा आयोजित करण्यात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. युवकांना अडीअडचणी असल्यास त्यांच्या अडचणी सोडवण्याचे काम देखील करणार असल्याचे सांगितले आहे.
Post a Comment
0 Comments