पुणे : पुणे शहरात अवैध बांधकामांचा सुळसुळाट वाढत आहे. यामागे पुणे महापालिकेतील काही बांधकाम अधिकाऱ्यांची आणि अवैध बांधकाम व्यवसायिकांची साठेबाजी असल्याचा आरोप होत आहे. नागरिकांनी या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येते. आणि नोटीस बजावून हे काही पैश्यांची साठेलोटे करून प्रकरण बंद अथवा दप्तरी करण्यात येते.
पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये अवैध बांधकामांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नियमांचे उल्लंघन करून बांधकामे उभारली जात आहेत. यामुळे शहराच्या नियोजन आणि विकासावर विपरीत परिणाम होत आहे.
मागे काही दिवसांपुर्वी शहरात अनेक ठिकाणी पुणे महानगरपालिकेने हातोडा मारण्याची कारवाई केली. परंतु कोंढव्यात फक्त नोटिशीच बजावल्या आणि काही ठिकाणी थोडीफार कारवाई देखील केली, कारवाई झाल्यानंतर काही दिवसच उलटले असता, कोंढव्यातील नवनाथ डेव्हलपर्स विकसक नवनाथ माने हे बांधकाम व्यावसायिक यांनी त्यांचे सुरू असलेले हाजरा पॅलेस नामक अवैध इमारतीचे काम पुन्हा सुरू केले असल्याचे निदर्शनास आले आहे.
नेमकं कोणती अदृश्य शक्ती यांच्या मागे आहेत. असा विचार करण्यात भाग पडले आहे.
याबाबतीत पुणे महापालिकेचे बांधकाम अधिकारी कनिष्ठ अभियंता विक्रम क्षीरसागर यांना माहिती दिली असता, त्यांनी त्यावर सांगितले की आम्ही त्यांना नोटीसी दिले आहेत. मागे कारवाई झाली आहे. असे टाळाटाळीचे उत्तर दिले आहे.
नागरिकांनी अवैध बांधकामांवर त्वरित कारवाई करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
क्रमशः
Post a Comment
0 Comments