जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक आरोपीसह दोनजणांना अटक...
पुणे : जादुटोणासारखे अघोरी कृत्य करुन व्यावसायिकाची २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक करणार्या मुख्य आरोपीसह दोघांना समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. अब्दुल हुसेन हसनअली नईमआबादी व सीमा ऊर्फ रोहा अब्दुल हुसेन नईम आबादी (वय ३५, रा.
याप्रकरणात समर्थ पोलिसांनी नादीर अब्दुल हुसैन हसन अली नईमा आबादी (रा. सिनागग ईस्ट्रीट, कॅम्प), सीमा उर्फ रोया नादीर नईमा आबादी (वय ३५, रा. कॅम्प), मौलाना शोऐब मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), माजीद उस्मान आत्तार (रा. बोपोडी), खालीद मैनुद्दीन आत्तार (रा. बोपोडी), इरम शोऐब आत्तार (रा. बोपोडी) यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा कायदा तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतिफ (वय ४५, रा. कोंढवा खुर्द) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी संगनमत करुन इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष फिर्यादींना दाखवले. शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे २ कोटी ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती. याप्रमाणेच या आरोपींनी फसवणुक केल्याचे तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या चार गुन्ह्यांमध्ये एकू ६ कोटी २३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.
पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी या आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेश वेगवेगळ्या तपास यंत्रणेला दिले होते. समर्थ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सौरभ थोरवे व पोलिस अंमलदार हेमंत पेरणे यांनी तांत्रिक विश्लेषण करुन या दोघांचा ठावठिकाणी कॅम्पमध्येच असल्याचे शोधून काढले व त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सौरभ थोरवे, ज्योती कुटे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments