मिनिस्ट्री ऑफ डान्स बारमध्ये नववर्षाच्या सेलिब्रेशनला हिंसक वळण ; बार चालकाने तरुणाला काचेच्या बाटलीने केली जबर मारहाण ; तरुण झाला रक्तबंबाळ...
पुणे :- शहरात लोकप्रिय असलेले मिनिस्ट्री ऑफ डान्स रेस्टॉरंट अँड बारमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनला हिंसक वळण लागले आहे. जेव्हा बार मालकाने 24 वर्षीय तरुणावर डान्स फ्लोअरवर असताना टेबलावरील लाकडाचा तुकडा तुटले या शुल्लक कारणावरुण त्याला दारूच्या काचेच्या बाटलीने मारहाण केली आहे. एफसी रोडवरील मिनिस्ट्री ऑफ डान्स या रेस्टॉरंट अँड बार मध्ये घटना घडली आहे. करण शिंदे असे पीडित युवकाचे नाव असून तो सेनापती बापट रोड येथील रहिवासी आहे. त्याच्यावर दोन्ही पक्षांमध्ये वादावादी झाल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी मिनिस्ट्री ऑफ डान्स रेस्टॉरंट अँड बारचे मालक मल्हार शिवतारे आणि श्लोक कामटे यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. ही घटना 1 जानेवारी रोजी पहाटे 3 च्या सुमारास घडली आहे. हे सर्व शिंदे आणि त्यांचे मित्र उपस्थित असलेल्या नवीन वर्षाच्या उत्सवात व्यत्यय आणण्यापासून सुरू झाले जेव्हा एक लाकडी फळी पडली ज्यामुळे बार चालकांमध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यानंतर बार चालक संतप्त झाला आणि तरुणाला दारूच्या काचेच्या बाटलीने डोकं फोडलं असल्याचे घटना समोर आली आहे.
या बाबतीत पोलिसांकडून माहिती घेतली असता, याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवाळे यांनी स्पष्ट केले की, बाचाबाची दरम्यान तणाव वाढला, रागाच्या भरात बार चालकाने काचेची रिकामी बाटली हिसकावून शिंदे यांच्या डोक्यात जबर वार केले. शिवाय, शिंदे आणि त्यांच्या मित्रांना या संघर्षाच्या वेळी धमक्यांचा सामना करावा लागला आहे.
शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. शिंदे यांना 4 टाक्या पडले आहेत. त्यांना एसबी रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 324 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिवाळे म्हणाले, "आम्ही बार चालक आणि इतर तीन संशयितांना नोटिसा बजावल्या आहेत आणि त्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे.
मिनिस्ट्री ऑफ डान्स रेस्टॉरंट अँड बार चालक गुंडगिरी करत असल्याची चित्र...
ही घटना घडल्यानंतर मल्हार शिवतारे यांची आई यांनी तक्रार दाराच्या सोबत असलेले मित्रांना असे सांगितले की तुम्ही असे कितीही गुन्हे दाखल करा आमचं पोलीस काहीही वाकडं करू शकत नाही. आणि आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करतो आमचे संपर्क खूप वरपर्यंत आहेत. आम्ही नारकोटिक्स, सामाजिक सुरक्षा, क्राईम ब्राँच याच्या अधिकारी आणि याच्याही वर आमचे संपर्क आहेत. आम्हाला अशा फालतू गुन्ह्याने काहीही फरक पडणार नाही. असे वक्तव्य मल्हार शिवतारे यांच्या आईने केले आहे.
यामध्ये आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की कोणते कोणते अधिकारी यांची पाठ राखण करत आहेत ? आणि यांना नेमकी कोणाकोणाची साथ मिळत आहे ? आणि पुणे शहर पोलिसांच्या कामावर मोठा प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झाला आहे.
तसेच या हॉटेल बाबत आणखीन माहिती घेतली असता या ठिकाणी अवैध हुक्का सुरू असल्याचे खात्रीलायक बाब आमच्या हाती लागली आहे.
तसेच यामध्ये नार्कोटिक्सचे 1 चे कोण कोणते अधिकारी आणि कर्मचारी सामील आहेत आणि हे यांच्यावर का कारवाई करत नाहीये याबाबत लवकरच आम्ही दुसऱ्या बातमीत माहिती समोर आणणार आहे.
यावर पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि प्रभारी पोलीस सह आयुक्त रामनाथ पोकळे आणि पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
काही महिन्यांपूर्वीही शेजारच्या दुकानावर केली होती दगडफेक आणि मारहाण केल्याची घटना...
मिनिस्ट्री ऑफ डान्स बार अँड रेस्टॉरंट चालकाने मागे काही महिन्यांपूर्वी ही शेजारी असलेल्या एका केक व्यवसायिकाच्या दुकानावर दगडफेक करून केक दुकानातील कर्मचारी यांना मारहाण केली होती. त्याबाबत त्या केक शॉप व्यवसाय करणे 100 नंबरला कॉल करून याबाबत सविस्तर कल्पना दिली होती. परंतु तक्रारदार गुन्हा दाखल करण्याकरिता गेले असता त्यांना तिथे धमक्या व दबाव देऊन ते गुन्हा दाखल करू नका असे दबाव आणण्यात आले होते.
याही गुन्ह्यात तक्रार दारावर गुन्हा मागे घेण्यासाठी पुढाऱ्यांकडून दबाव...
याबाबत आणखीन माहिती घेतली असता, त्यामध्ये असे कळाले की, तक्रारदार करण शिंदे यांना आणि यांच्या आई व इतर नातेवाईकांवर गुन्हा मागे घेण्यासाठी शिवतारे यांनी काही स्थानिक पुढाऱ्यांच्या माध्यमातून गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणत असल्याचे दुर्दैवी बाब कळाली आहे.
Post a Comment
0 Comments