Type Here to Get Search Results !

गोवंडी येथील झाकीर हुसैन नगर भागात झोपडपट्टीत भीषण आग मुंबईतील घटना

गोवंडी येथील झाकीर हुसैन नगर भागात झोपडपट्टीत भीषण आग मुंबईतील घटना...

मुंबई : गोवंडी येथील झाकीर हुसैन नगर भागात झोपडपट्टीत भीषण आग लागली आहे. या झोपडपट्टीत अनेक छोटे कारखाने आहेत. या कारखान्यांपैकी बॅग बनवण्याच्या कारखान्यात झालेल्या सिलिंडरच्या स्फोटामुळे आगीचा भडका उडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार बंब पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एकमेकांना खेटून असलेल्या छोट्या छोट्या झोपड्यांमुळे आग वेगाने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आग लागलेल्या झोपड्या या पक्क्या स्वरुपाच्या नाहीत त्यामुळे आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांनाही कठीण जात आहे.

Post a Comment

0 Comments