पुणे :- डॉ . ए .पी .जे .अब्दुल कलाम फाउंडेशन च्या 5 व्या वर्धापनदिना निम्मित भव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा आझम कॅम्पस येथे आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये 50 पेक्षा ही जास्त संघाने सहभाग घेतला. यामध्ये पुणेसह लातूर, भूम, परांडा, बार्शी व इतर जिल्ह्यातील देखील संघाने यामध्ये प्रामुख्याने सहभाग घेतला.
अतिशय सुंदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी फाउंडेशनच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या स्पर्धेचे आयोजन डॉ. ए .पी .जे .अब्दुल कलाम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गफूर शेख, महा.राज्य अध्यक्ष आरिफ हंनुरे, महा.राज्य उपाध्यक्ष सुनील घुले, महा. राज्य सचिव अश्फाक भाई सय्यद, मोसीन शेख, राहील शेख, सादिक शेख, शाहिद शेख, प्रदीप जाधव, शोएब सय्यद, इरफान हंनुरे, वसीम सय्यद, मोईन मोमीन, सलीम चौधरी, याकूब हावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार जगदीश मुळीक, संतोष राजगुरू, अली इनामदार, अफसर अटपल्ले, संतोष आरडे, संतोष कांबळे ,समीर शेख, ओमकार कदम, तौसिफ कुरेशी, रफिक शेख , सादिक लुकडे, अय्युब लुकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments