Type Here to Get Search Results !

नवाब मलिक यांना जमीन वाढवून देण्यास हायकाेर्टाचा नकार...

नवाब मलिक यांना जमीन वाढवून देण्यास हायकाेर्टाचा नकार...

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अंतरिम जामिनात वाढ करून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांची तीन महिन्यांसाठी जामिनावर सुटका केली.

या अंतरिम जामिनात वाढ करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जा, असे निर्देश न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकलपीठाने मलिक यांच्या वकिलांना दिले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक करण्यात आली. मलिक यांनी त्यांच्या आजारपणाचे कारण देत अंतरिम जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र, विशेष न्यायालयाने व त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्याने मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आपली एक किडनी काम करत नसून दुसरी किडनी कमजोर असल्याचे कारण त्यांनी जामीन अर्जात दिले.

बुधवारी त्यांच्या नियमित जामीन अर्जावर उच्च न्यायालयात
सुनावणी होती. या सुनावणीवेळी मलिक यांच्या वकिलांनी मलिक यांच्या अंतरिम जामिनाची मुदत ९ जानेवारी रोजी संपत असल्याने त्यात वाढ करून देण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यासाठी मलिकांच्या वकिलांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे निर्देश देत नियमित जामीन अर्जावरील सुनावणी १५ जानेवारी रोजी ठेवली.

Post a Comment

0 Comments