Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

टाईम्स ऑफ महाराष्ट्राचा निष्कर्ष ठरला खरा ; पुण्याचे पोलीस आयुक्त पदी अमितेश कुमार यांची नियुक्ती...

टाईम्स ऑफ महाराष्ट्राचा निष्कर्ष ठरला खरा ; पुण्याचे पोलीस आयुक्त पदी अमितेश कुमार यांची नियुक्ती...

पुणे :- बऱ्याच दिवसापासून पुणे शहर पोलीस आयुक्त बदलणार असल्याचे चर्चा सुरू होती. त्यालाच आज शिक्कामोर्तब झालाय. पुणे शहराच्या पोलीस आयुक्त पदी अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टाईम्स ऑफ महाराष्ट्रने काही दिवसांपूर्वीच याचा निष्कर्ष लावला होता आणि तेच खरं ठरलं असल्याचे दिसून आले आहे. 
सध्या ते नागपूर शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते.
ते १९९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांनी औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त म्हणून तर मुंबई वाहतूक पोलिस शाखेचे सहआयुक्त म्हणून काम केले आहे. नागपूर पोलीस आयुक्त होण्याआधी अमितेश कुमार हे राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होते.
लोकसभा निवडणुकीच्या आधी अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. संजय यादव यांची मुंबईचे जिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात येणार आहे. राजेंद्र क्षीरसागर यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी रविंद्र सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलीये.

अमितेश कुमार हे आपल्या कामाच्या शैलीने ओळखले जातात.
२००७ मध्ये भारत विरुद्ध क्रिकेट सामना खेळत असताना वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मरलोन सॅम्युअल आणि दाऊद इब्राहिमच्या हस्तक मनोज कोचर यांच्यामधील होणारी बातचीत रेकॉर्ड करून क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या कामगिरीसाठी अमितेश कुमार यांची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती.

Post a Comment

0 Comments