Type Here to Get Search Results !

अल्पवयीन मुलासोबत वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक...

अल्पवयीन मुलासोबत वाॅशिंग सेंटरवर काम करून उर्वरित वेळेत दुचाकीची चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक...

पिंपरी : अल्पवयीन मुलासोबत मिळून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास पोलिसांनी अटक केली. भोसरी, पिंपरी, शिरुर व इतर भागातून दुचाकी चोरी केल्याचे प्रकार उघडकीस आले. त्याच्याकडून चोरीच्या दोन लाख ३० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी हस्तगत केल्या.

वाॅशिंगसेंटरवर काम करून उर्वरीत वेळेत तो दुचाकी चोरी करायचा. भोसरी पोलिसांनी ही कारवाई केली. 


मोहंमद राशीद शाहीद शेख (२०, रा. वल्लभनगर, पिंपरी), असे अटक केलेल्याचे नाव आहे. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी सुरू होती. त्यात मोहंमद राशीद हा संशयितपणे वावरताना आढळला. सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. 

सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे, उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, पोलिस अंमलदार हेमंत खरात, डी. बी. केंद्रे, रमेश भोसले, नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.


चोरीच्या दुचाकी कंपन्यांच्या पार्किंगमध्ये


मोहंमद राशीद हा एका १६ वर्षीय मुलासोबत मिळून दुचाकी चोरी करायचा. चोरलेली दुचाकी एमआयडीसीतील कंपन्यांच्या बाहेरील पार्किंगमध्ये पार्क करायचा. काही दिवसांनंतर ती चोरीची दुचाकी पुन्हा इतर ठिकाणी पार्क करायचा. 

Post a Comment

0 Comments