Type Here to Get Search Results !

Add

Add

कार आणि ट्रकची टक्कर झाला भीषण अपघात ४ जण जागेत ठार १ गंभीर जखमी

कार आणि ट्रकची टक्कर झाला भीषण अपघात ४ जण जागेत ठार १ गंभीर जखमी...

रयाणा : पंजाबच्या होशियारपूर येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. ट्रक आणि कारच्या धडकेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, कारमधील मृतांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केल्याचं पाहायला मिलालं.

त्यानंतर, तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

होशियापूरच्या उच्ची बसी प्रदेशात ही घटना घडली. ट्रक आणि कारमध्ये समोरासमोर जोराची धडक बसल्याने भीषण अपघात झाला. त्यामध्ये, कारला आग लागली होती. त्यात, चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे समजते.

अपघाताची घटना घडताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली, तसेच पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पोलिसांनी फायर ब्रिगेडच्या गाडीला पाचारण करुन घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या बंबाने कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांनी अपघातातील मृतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. तर, जखमी व्यक्तीला मुकेरियाच्या सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Post a Comment

0 Comments