मुलगा रणबीर कपूरची ऍनिमल पाहिल्यानंतर नितु कपूर झाली भावुक...
रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा रंगली होती. 'ॲनिमल' मधील रणबीर कपूरच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रणबीरचा राऊडी लूक दिसत आहे. त्याचे केस आणि दाढी वाढलेली दिसत असून रणबीरने चेहऱ्यावर गॉगलही लावल्याचं दिसत आहे. ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर भावुक झाल्या आहेत. रणबीरचा हा फोटो शेअर करत त्यांनी "आज ऋषी कपूर हवे होते", असं स्टोरीमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या स्टोरीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
रणबीरने २००७ साली सावरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. कपूर घराण्यात जन्मलेल्या रणबीरला लहानपणापासून आईवडिलांकडून अभिनयाचे धडे मिळाले. 'वेक अप सिद', 'संजू', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'ब्रह्मास्त्र' , 'रॉकस्टार', 'ये जवानी है दिवानी', 'बर्फी' अशा सुपरहिट चित्रपटांतून रणबीरने त्याच्या दमदार अभिनयाची झलक दाखवली. आता 'ॲनिमल'मधून त्याच्या अभिनयाचे पैलू दिसत आहेत.
Post a Comment
0 Comments