टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो ;- आजचा दिवस आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने देशासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दुपारी १२.३० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनूसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशात भाजपाला पुन्हा एकदा मोठे बहुमत मिळत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही भाजपा पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. छत्तीसगडमध्येही मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपाची कामगिरी चांगली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपाच्या यशाची सर्वत्र चर्चा रंगू लागली आहे.
अय्यरकडून मोदी शहांचे अभिनंदन...
भारताचा माजी क्रिकेटपटू व्यंकटेश अय्यरने मोदी आणि अमित शहा यांचे अप्रतिम कामगिरीबद्दल तोंडभरून कौतुक केले. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "सनातन धर्माला शिवीगाळ केल्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. मोठ्या विजयाबद्दल भाजपाचे खूप खूप अभिनंदन... पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अप्रतिम नेतृत्वाची आणखी एक साक्ष. तसेच भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपाने निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना कोणत्याही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मात्र जाहीर केला नाही. पंरतु, २०१८मध्ये भाजपाने मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान, राजस्थानमध्ये वसुंधरा राजे आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. परिणामी तिन्ही राज्यात भाजपाचा पराभव झाला. मात्र यावेळी भाजपाने तसे केले नाही. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित करणं टाळलं. भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने निवडणूक लढवली आणि त्याचा मोठा परिणामही दिसून येत आहे.
Post a Comment
0 Comments