पिंपरी : बीआरटी मार्गावर दुचाकीला ओव्हरटेक करताना दुचाकी पीएमपीएमएल बसला धडकली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. रावेत येथे भोंडवेवस्ती येथील बीआरटी मार्गावर बुधवारी (दि. २९) हा अपघात झाला.
पीएमपीएमएल बसचालकाने याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अक्षय जयकुमार ओहोळ (२६, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बसचालक हे त्यांच्या ताब्यातील पीएमपीएमएल घेऊन बीआरटी मार्गावरून जात होते.
यावेळी अक्षय हा त्याच्या ताब्यातील दुचाकीवरून बीआरटी मार्गाने जात होता. त्यावेळी दुसऱ्या दुचाकीला ओव्हरटेक करून वेगात येऊन पीएमपीएमएल बसला ओहोळ याची दुचाकी धडकली. यात तो गंभीर जखमी झाला. या अपघातात अक्षयचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे तपास करीत आहेत.
Post a Comment
0 Comments