Type Here to Get Search Results !

महिलेचा विनयभंग करुन तिच्या पतीसोबत केली मारहाण, मदतीसाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात घातला दगड ; आरोपी अटक...

महिलेचा विनयभंग करुन तिच्या पतीसोबत केली मारहाण, मदतीसाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात घातला दगड ; आरोपी अटक...

पिंपरी :जेवणानंतर शतपावली करुन घराजवळ बोलत उभारलेल्या महिलेचा विनयभंग (Molestation Case) केला. तसेच पतिला मारहाण केली. यावेळी मदतीसाठी आलेल्या शेजारच्या महिलेच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केल्याची घटना दिघी येथील आदर्शनगर मध्ये बुधवारी (दि.२९ नोव्हेंबर) रात्री अकराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी महिलेने गुरुवारी (दि.३० नोव्हेंबर) दिघी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन परमेश्वर पांचाळ (वय-४१ रा. आदर्श नगर, दिघी) याच्यावर आयपीसी ३५४,३५४अ,५०९,३२३,५०४,५०६,३४ सह महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेसोबत शतपावली करण्यासाठी गेल्या होत्या. रात्री अकराच्या सुमारास शतपावली करुन आल्यानंतर त्या महिलेसोबत घराजवळ बोलत उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी पांचाळ हा वाईट नजरेने त्यांच्याकडे बघत होता. याबाबत फिर्यादी यांनी आरोपीकडे जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपी पांचाळ याने महिलेच्या नाकावर चावी मारुन जखमी केले. तसेच जवळ ओढून गैरवर्तन करत विनयभंग केला.

यावेळी फिर्यादी यांच्यासोबत असलेली महिला मध्ये पडली असता आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले.
फिर्यादी यांच्या पतीला हाताने मारहाण केली. महिलेने तक्रार दिल्यानंतर दिघी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल
करुन अटक केली आहे.


Post a Comment

0 Comments