ग्रामपंचायत निवडणूक विरोधात एकाला लाकडाने बेदम मारहाण एकावर दुखापतीचा गुन्हा दाखल...
सातारा : राजापूरी, ता. सातारा येथे ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिला म्हणून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये संबंधित जखमी झाले आहेत. याप्रकरणी एकावर तालुका पोलिस ठाण्यात दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधात उभा राहिल्याच्या कारणातून संशयित हा तक्रारदार बाबाजी मोरे यांच्या समोरुन वाहन जोरात घेऊन गेला. त्यानंतर शिवीगाळ करत तुला मस्ती आली आहे असे म्हणत गाडीतून उतरुन हातातील लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी मोरे यांनी दांडके अडविण्यासाठी हात केला. मात्र, मारहाणीत त्यांच्या दोन्ही हाताला मुक्का मार बसला. तसेच यावेळी मोरे यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.
Post a Comment
0 Comments