निवडणूक जिंकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्री पदाबद्दल मोठं विधान...
भोपाळ : दोन दिवसांपूर्वी नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपाने या निवडणुकीत काँग्रेसवर ३-१ ने मात केली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तरेकडच्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने काँग्रेसला मोठ्या फरकाने पराभूत केलं.
मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा सुरु असतानाच शिवराज सिहं चौहान यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. 'मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि ना आहे' असं शिवराज यांनी म्हटलं आहे. एमपी विधानसभा निवडणुकीत भाजपाने २३० पैकी १६३ जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त 66 जागांवर समाधान मानाव लागलं. 'पंतप्रधान मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्यासोबत काम करण ही सौभाग्याची गोष्ट आहे. मी भाजपा कार्यकर्ता आहे. मी जनतेचा ह्दयापासून आभारी आहे. मला जितकं शक्य झालं, तितक मी काम केलं' असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. त्यांनी ANI ही मुलाखत दिली.
भाजापच्या यशामागची गेम चेंजर योजना कुठली?
या निवडणुकीत शिवराज सिंह चौहानच भाजपाच्या विजयाचे खरे नायक आहे. 64 वर्षाच्या शिवराज यांनी राज्यातील प्रस्थापित सरकारविरोधी लाटेवर मात करुन विजय मिळवला. भाजपाच्या या विजयामागे सर्वाधिक चर्चा 'लाडली बहना' योजनेची आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाच्या विजयासाठी या योजनेला गेम चेंजर म्हटलं जात आहे. पक्षाने निवडणुकीआधी शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रस्तुत केलं नव्हतं.
Post a Comment
0 Comments