माणसं पक्ष कसे सोडून जातात ; यावर त्यांनी पुस्तक लिहावं, शरद पवारांचा प्रफुल्ल पटेलांना टोला...
पुणे : अजित पवार गटाचे कर्जत येथे दोन दिवसीय शिबीर पार पडले. या शिबीरात अजित पवार यांनी शरद पवार यांच्या बाबत अनेक दावे केले. तसेच प्रफुल्ल पटेल व अजित पवार यांनी शरद पवारांवर टीकाही केली.शनिवारी शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.'अजित पवार यांना त्यांचा राजकीय निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र माझी त्यांच्याबाबत फक्त एकच तक्रार आहे की, त्यांनी हा निर्णय आता घेण्याऐवजी ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नावावर निवडणुकीचा अर्ज दाखल केला, त्यांना जे तिकीट देण्यात आलं ते माझ्या किंवा जयंत पाटील यांच्या सहीने आणि मान्यतेने देण्यात आलं आणि त्यांनी लोकांमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या नावावर मतं मागितली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय घ्यायला हवा होता. त्यांनी आता पक्षाशी विसंगत भूमिका घेणं योग्य नाही, हेच माझं म्हणणं आहे,' अशा शब्दांत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सुनावले आहे. तसेच ते ज्या मार्गाने जाण्याचा विचार करत होते तचो मार्ग आम्हाला मान्यच नव्हता, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रफुल्ल पटेल यांनी त्या शिबीरात आपण लवकरच एक पुस्तक लिहून काही गोष्टी उघड करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याला शरद पवार यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं. 'प्रफुल्ल पटेलांच्या पुस्तकाची मीही वाट बघत आहे. लोक पक्ष सोडून कसे जातात, यावर त्यांनी पुस्तक लिहावं, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.
Post a Comment
0 Comments