कसबा पेठ मतदारसंघातील मतदार आमदार रवींद्र धंगेकारांवर नाराज ; रवींद्र धंगेकर यांना मोठा फटका बसण्याची शक्यता ?
पुणे :- राज्यातील सर्वात जास्त चर्चेचे असलेले कसबा पेठ पोटनिवडणूक होऊन अगदी काहीच महिने उलटून गेले असता, त्यातच आता एक नवीन प्रकार सध्या मतदार संघात सुरू झाला आहे.
कसबा पेठ मतदारसंघातील मुस्लिम समाजातील काही प्रमाणात जनता आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याही पलीकडे मोमीनपुरा भागातील असंख्य युवा पदाधिकारी आमदार रवींद्र धंगेकर यांना सांगितले कामे करत नसल्याने त्रस्त होऊन भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी मोमीनपुरा भागातले काही नागरिक भाजपचे हेमंत रासने यांना भेट घेतली असल्याचे समजले जात आहे.
हेमंत रासने पराभूत होऊन सुद्धा सोडवतायेत नागरिकांचे प्रश्न...
त्यातच तेथील असलेले काही नागरिकांनी सांगितले की, हेमंत रासने हे पोटनिवडणुकीत पराभूत होऊन सुद्धा आमच्या संपर्कात आहेत. आम्हाला अधी मधी संपर्क करून विचारपूस करत असतात. नागरिकांचे प्रश्न उद्भवल्यास स्वतः पुढाकार घेऊन सोडवत असल्याचे आम्ही पाहत आहोत. त्यांचे काम सलग सुरू असतात. नागरिकांना मदत लागल्यास किंवा काही शासकीय काम अडल्यास ते स्वतःहून शासकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून कामे मार्गी लावत असल्याचे आम्ही पाहत आहोत.
अगदी काही महिन्यातच असे काय प्रकार झाले ? नागरिकांमध्ये असा रोष का निर्माण झाला ? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत.
त्यातच मतदार संघातील आणखी काही नागरिकांशी याबाबत बातचीत केली असता. त्यापैकी एका वरीष्ठ नागरिकाने सांगितले की, आम्ही पोटनिवडणुकीत अतिशय मनाने धंगेकरांचे काम केले. तसेच एक रुपया देखील त्यांचा आम्ही घेतलेला नाही. उलट आम्हीच त्यांच्यासाठी पैसे खर्च केले आहे. आम्हाला त्यांच्याकडून फक्त कामाची अपेक्षा होती. त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे आम्हाला अपेक्षित होतं, परंतु त्यांच्याकडून सर्व नागरिकांचे अपेक्षा भंग करण्याचे काम त्यांनी केले आहे.
त्यांच्या वागणुकीत फार बदल झाल्याचे आम्ही जवळून पाहिले आहे. ते नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे आम्ही पाहिले आहे. पुढील विधानसभा निवडणुकीला जास्त वेळ नाहीये. आम्ही आमच्या मताची ताकत निवडणूकित दाखवून देऊ असे कसबा पेठ मतदारसंघातील नागरिकाने सांगितले. अश्या अनेक तक्रारी मुळे त्यांना भविष्यात याचा मोठा फटका बसणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
Post a Comment
0 Comments