सातारा : इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या १७ वर्षीय तरुणीवर एका तरुणाने विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात संबंधित तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
हा प्रकार २६ ऑक्टोबर २०२३ रोजी घडला. मात्र, घाबरलेल्या पीडित तरुणीने या घटनेची कोठेही वाच्यता केली नाही. ती घरात शांत राहत असल्याने आईने तिची विचारपूस केली असता घडलेला प्रकार तिने आईला सांगितला. त्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात पीडित तरुणीने तक्रार दाखल केली. संशयित आरोपी विशाल अवघडे याला अद्यापपर्यंत अटक झाली नव्हती. सहायक पोलिस निरीक्षक पालवे हे अधिक तपास करीत आहेत.
Post a Comment
0 Comments