Type Here to Get Search Results !

ड्राइवर क्लिनर वाद घालायला लागले, त्यात वेगाने आलेल्या टेम्पोने दोघांना उडवले मुंबईतील घटना

ड्राइवर क्लिनर वाद घालायला लागले, त्यात वेगाने आलेल्या टेम्पोने दोघांना उडवले मुंबईतील घटना...

मुंबई : सिमेंट मिक्सरची टॅक्सीला धडक बसताच ड्रायव्हर आणि क्लिनरने खाली उतरून वाद घालण्यास सुरुवात केली. धडक एकमेकांच्या जीवावर बेतू शकते यावरून वाद सुरू असताना भरधाव वेगाने आलेल्या टेम्पो टॅक्सीला येऊन धडकला.

या अपघातात ड्रायव्हर, क्लिनर जागीच ठार झाले तर तीनजण जखमी झाल्याची घटना लालबाग भागात घडली.

या अपघात ड्रायव्हर दुर्योधन गायकवाड आणि क्लिनर राजेश जयस्वाल याचा मृत्यू झाला, टॅक्सीतील महिला प्रवासी, सिमेंट मिक्सरचालकासहित एकजण जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी टेम्पोचालक लल्लूलाल विरोधात गुन्हा नोंदवला आहे भायखळ्याच्या दिशेने येत असलेल्या सिमेंट मिक्सर आणि टॅक्सीची धडक बसली. चालक आणि क्लिनरखाली उतरून भांडण सुरू झाले. महिला प्रवाशानेही जाऊ देत वाद नको म्हणून आतून आवाज देण्यास सुरुवात केली.

लालबाग चौकीच्या समोरील लालबाग उड्डाणपुलावर भायखळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर टेम्पो आणि टॅक्सीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ड्रायव्हर, क्लिनर जागीच ठार झाले तर तीनजण जखमी झाले.

टॅक्सीतून अर्धे शरीर बाहेर...पण -
 लालबाग चौकीच्या समोरील लालबाग उड्डाणपुलावर भायखळ्याकडे जाणाऱ्या रोडवर गंभीर अपघात झाला. अपघातामुळे एक किलोमिटरपर्यंत वाहतूक होती.
 वाहतूक कोंडी होऊन रस्ता बंद झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा, कंपनीचा सिमेंट मिक्सरच्या पाठीमागून एक टॅक्सी धडकली होती. टॅक्सीवर पाठीमागून येणारा टेम्पो जोरदार धडकला होता. याचमध्ये दोनजण चिरडले होते.
 दुसरीकडे टॅक्सीची पुढील काच तुटून त्यामधून तिच्या शरीराचा अर्धा भाग पुढे आलेला, तर शरीराचा अर्धा भाग टॅक्सीच्या पुढील दोन्ही सीटमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. मात्र महिलेचा श्वास सुरू असल्याने पोलिसांनी तत्काळ महिलेला बाहेर काढून जे. जे. रुग्णालयात दाखल केले. कोकिळा वाघोरी असे महिलेचे नाव असून, त्या यामध्ये गंभीर जखमी आहेत.

तो धक्का बेतला जीवावर... वाद मिटणार तोच...
मिक्सरचा सुपरवायझर उत्तम पांडुरंग काळेल यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मिक्सरचा चालक जय राम यादव याने त्यांना कॉल करून कळविले की, त्याचा मिक्सरचा किंचितसा धक्का टॅक्सीला लागला होता. त्यामुळे टॅक्सीचालकाने त्याचा मिक्सर थांबविला होता व तो टॅक्सीचालक त्यांच्याशी वाद घालत होता. त्यावेळी उत्तम काळेल यांनी चालकाचे मोबाइलवरून टॅक्सीचालकाशी बोलला व त्यास नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन देऊन सिमेंट मिक्सर जाऊ देण्याबाबत विनंती केली होती. ती विनंतीही त्याने मान्य केली. दोघे माघारी जाणार तोच पाठीमागून येणाऱ्या टेम्पोच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.


Post a Comment

0 Comments