Type Here to Get Search Results !

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता होणार लागू...

पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून ४ टक्के महागाई भत्ता होणार लागू...

पुणे :- पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यातील ४ टक्के वाढ १ जुलैपासून लागू करण्यात आली आहे. महापालिकेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

चार महिन्याचा फरक नोव्हेंबर आणि डिसेंबर च्या वेतनातून दिला जाणार आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 5 महिन्याचा फरक डिसेंबर आणि जानेवारी च्या निवृत्ती वेतनातून दिला जाणार आहे.

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता दिला. त्यानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली आहे. १ जुलै २०२३ पासूनही वाढ लागू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार १ जुलै २०२३ पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ४२ वरुन ४६ टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ १ जुलै २०२३ ते ३१ ऑक्टोबर २०२३ या चार महिन्याच्या कालावधीतील थकबाकीसह नोव्हेंबर आणि डिसेंबर च्या वेतनातून द्यावा असा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित दराचा जुलै ते नोव्हेंबर असा 5 महिन्याचा फरक डिसेबंर आणि जानेवारी च्या पेन्शन मधून दिला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments