अचानक लागलेल्या आगीत बस झाली खाक ; सर्व प्रवासी सुखरूप...
पुणे:- चाकण-तळेगाव मार्गावर मंगळवारी (दि. २१) मध्यरात्री एसटी महामंडळाच्या राजगुरुनगर आगाराच्या मुंबई-घोडेगाव बसला चाकण (ता. खेड) येथील राणूबाईमळा भागात आग लागली.
राणूबाईमळा येथील स्थानिक आणि एसटी बसचे चालक आणि वाहक यांनी बसला आग लागल्याचे लक्षात येताच प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून परिसरातून पाणी आणून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपूर्ण एसटी बस आगीत जळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. प्रशासनाचे एसटीच्या दूरवस्थेकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप प्रवासी करत आहेत.
Post a Comment
0 Comments