Type Here to Get Search Results !

Add

Add

पत्ता विचारणाऱ्या लोकांपासून रहा सावध कार साइडला घ्यायला लावून लुटले पुणेतील घटना

पत्ता विचारणाऱ्या लोकांपासून रहा सावध कार साइडला घ्यायला लावून लुटले पुण्यातील घटना...

पुणे: पत्ता विचारण्यासाठी कार चालकाने गाडी साईडला घेतली असताना चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. साहिल सुनिल गोडांबे (वय २१), योगेश लक्ष्मण जानकर (वय २७, दोघे रा.

सोमेश्वरवाडी, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत मांजरी येथील एका ३२ वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार पाषाणमधील जाधव हाईटजवळ बुधवारी पहाटे सव्वा दोन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कार घेऊन जात होते. त्यांना पत्ता माहिती नसल्याने त्यांनी आरोपीला पत्ता विचारला. त्याने पत्ता न सांगता त्यांच्या गाडीत येऊन बसून माझा भाऊ येणार आहे, थोडीशी गाडी साईउला घेऊन बाजूला थांब असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी बाजूला थांबले. काही वेळात एक जण मोटारसायकलवरुन आला. त्याने चाकूचा धाक दाखवून आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत हाताने मारहाण करुन दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांच्याकडून ३ हजार ३०० रुपये जबरदस्तीने घेऊन पळून जाऊ लागले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला. तेव्हा लोक जमले. त्यांच्याकडील चाकू पाहून ते पळून गेले. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments