Type Here to Get Search Results !

Add 1 BY 4 1200 PX By 300 PX

शरद पवार आणि अजित पवारांच्या मुलाखतीवर जयंत पाटील म्हणाले -"त्यावर मला भाष्य करायचे नाही...

शरद पवार आणि अजित पवारांच्या मुलाखतीवर जयंत पाटील म्हणाले -"त्यावर मला भाष्य करायचे नाही..."
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची आज सकाळी अजित पवार गटातील नेते आणि सरकारमधील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच अजित पवार आणि शरद पवार यांचीही प्रतापराव पवारांच्या घरी दिवाळीनिमित्त भेट झाली.

ज्यामुळे दोन्ही गटातील प्रमुख नेत्यांच्या लागोपाठ भेटी झाल्याने याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा करण्यात येत आहेत. काका-पुतण्यांच्या आजच्या भेटीवेळी सुप्रिया सुळे देखील तिथेच उपस्थित होत्या. परंतु, या भेटीबाबत जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

आजच्या या भेटीबाबत जयंत पाटील प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मला त्यावर काही भाष्य करायचे नाही. कुटुंबाने कुठे भेटावे? काय करावे? याविषयी तुम्ही किंवा मी भाष्य करण्याची आवश्यकता नाही. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाविषयी काही प्रश्न असेल तर मी जरूर उत्तर देईन. कुटुंबाने काय करावे? याविषयी मी भाष्य करणे उचित नाही, असे म्हणत त्यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे.

आज पुण्यातील मोदी बागेत शरद पवार यांची दिलीप वळसे पाटील यांनी भेट घेतली. त्यानंतर शरद पवार यांचे बंधू आणि पुण्यातील उद्योगपती प्रतापराव पाटील यांच्या घरी शरद पवार आणि अजित यांची भेट झाली. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा करण्यात येत आहे. परंतु, प्रतापराव पवार यांच्या घरी झालेल्या भेटीबाबत शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी माहिती देत सांगितले की, आजचा दिवस खूप आनंदाचा असतो. नेहमीप्रमाणे सर्वजण एकत्र आले होते. एकमेकांची मजा, मस्करी, गप्पा रंगल्या होत्या.

तर, भाऊबीजेला दरवर्षी पवार कुटुंब एकत्र जमलेले असते. त्यामुळे या भाऊबीजेला पवार कुटुंबीय बारामतीमध्ये एकत्र येणार का? असा प्रश्न प्रसार माध्यमांनी सरोज पाटील यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, बारामतीत कुटुंब एकत्र येणार नाही, मी कोल्हापूरला निघाले आहे. तर अजित पवार यांची प्रकृती आता बरी असल्याची माहिती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली.


Post a Comment

0 Comments